Nandurbar: आमदार बंब यांचा शिक्षकांकडून काळ्या फिती लावून निषेध

आमदार बंब यांचा शिक्षकांकडून काळ्या फिती लावून निषेध
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : जिल्हा परिषद शिक्षकांविषयी अपूर्ण आणि चुकीची माहिती आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) यांनी दिली. यामुळे आमदार प्रशांत बंब यांच्या शिक्षकांविषयीच्या चुकीच्या आणि बदनामीकारक कथनाविरोधात आज (Teacher) शिक्षक परिषदेच्यावतीने काळ्या फिती लावुन आंदोलन केले जात आहे. (Nandurbar Today News)

आज शिक्षक दिन आहे. खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या (Nandurbar) गौरवाचा दिन आहे. मात्र काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आमदार प्रशांत बंब यांनी सभागृहात जिल्हा परिषद शिक्षकांविषयी अपूर्ण आणि चुकीच्या माहितीच्या आधारे बदनामीकारक कथन केल्याचा आरोप शिक्षक परिषदेकडुन केला जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या असुन या विरोधात आज त्यांनी काळ्या फिती लावुन प्रतिकात्मक निषेध आंदोलन करत आहे. आज शालेय कामकाजावर आलेल्या प्रत्येक शिक्षकाने आपल्या हातावर काळ्या फिती लावल्या असल्याचे चित्र दिसुन आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com