जयंत पाटीलांची ग्‍वाही..पुन्‍हा एकदा येईल..

जयंत पाटीलांची ग्‍वाही..पुन्‍हा एकदा येईल..
जयंत पाटील
जयंत पाटील
Published On

शहादा (नंदुरबार) : गट गणांचा उमेदवारांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकदिलाने काम कर व पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावे. बुथ रचना मजबूत करावी. निवडून आलेल्या गट, गणांच्या उमेदवारांच्या सत्कारासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात येईल; अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. (nandurbar-news-shahada-jayant-patil-program-zilha-parishad-and-panchayat-samiti-election)

शहादा येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, मोहन शेवाळे, दंगल सोनवणे, सुरेंद्र कुवर आदींसह जिल्हा पदाधिकारी सर्व सेल आघाडी फ्रंटचे पदाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार, सरपंच, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की पक्षात पूर्वीपेक्षा अधिक चैतन्य आले आहे. महिलांचे पक्षात कार्य चांगले सुरू आहे. निवडणूक ज्या ठिकाणी आहे तिथे बुथ कमिट्याची मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे. त्याचवेळी चळवळ जिवंत राहते. बुथ कमिट्या स्थापन होतात; परंतु त्यांना जर भेटलो नाही तर त्या स्थापन करून काय उपयोग. यासाठी तालुकाध्यक्षांनी बुथ कमिट्यांची भेट घ्यावी.

जयंत पाटील
चिमुकल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यु

माजी आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले, जिल्ह्यात अनेक सिंचन योजनांची कामे अपूर्ण राहिली आहेत. राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त होईल. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटातील उमेदवार व स्थिती सांगितली. जिल्ह्यात पक्षाची स्थिती चांगली असल्याने उमेदवार निवडून येतील. तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश प्राप्त करून देण्याची खात्री दिली. यावेळी भाजपच्या सीमा सोनगिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्याही सन्मान करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com