Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar: अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव; मृत महिलांच्या वारसांना आठ लाखाचा निधी

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव; मृत महिलांच्या वारसांना आठ लाखाचा निधी
Published on

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यात अनेकांचे घरांचे नुकसान झाले आहेत. तसेच शेतातील पिकांचे देखील नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्‍तांना शासनाकडून मदत व्‍हावी; यासाठीचे (Nandurbar News) प्रस्‍ताव सादर करण्यात आले आहेत. (Nandurbar Today News)

Nandurbar News
Nandurbar: माल वाहतूक रेल्वेच्या धडकेत एक ठार

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) घरांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे योग्य पंचनामे करून त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील राज्य महामार्ग यावर सुरू असलेल्या कामांवरील जुने पूल व नवे पूल यांच्या दुरुस्ती संदर्भात संबंधित विभागाला तात्काळ आदेशित करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील गावांची वाहतूक व्यवस्था लवकरच सुरळीत होणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी सांगितले आहे.

मृत महिलांच्‍या वारसांना मदत

अतिवृष्‍टीमुळे नदींना पुर आला होता. जिल्‍ह्यातील दोन महिलांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यु झाला आहे. त्या महिलांच्या नातेवाईकांना आठ लाख रुपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याचे नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com