MSRTC Bus : नंदुरबार जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द; अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीचा परिणाम

Nandurbar News : काही भागात तर मुसळधार पाऊस सुरु असल्याने राज्यातील पूरसदृश स्थिती आणि अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत
MSRTC Bus
MSRTC BusSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. यामळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर पुराचा पाणी तसेच काही ठिकाणी कमी उंचीचे पूल देखील पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. 

MSRTC Bus
Gadchiroli News : गरोदर महिलेला खाटेवर घेऊन उपचारासाठी तीन किलोमीटर पायपीट; गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

राज्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरु आहे. काही भागात तर मुसळधार (Rain) पाऊस सुरु असल्याने राज्यातील पूरसदृश स्थिती आणि अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. बऱ्याचदा तासनतास पूर ओसरत नसल्याने गाड्या मार्गावरच उभ्या करून ठेवाव्या लागतात. यात राज्य परिवहन महामंडळाच्या बस (MSRTC Bus) देखील अडकल्याने प्रवाशांना तात्कळत बसावे लागते. शिवाय चालक वाहकांना देखील यात त्रास होत असतो. त्यामुळे अनेक आगारातून लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

MSRTC Bus
Crop Insurance : संभाजीनगर जिल्ह्यातील ९ लाखांवर शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

नंदुरबारमधून ४० फेऱ्या रद्द 

एसटीच्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. आधीच महामंडळ तोट्यात चालू आहे. त्यातच ४० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाला पुन्हा पावसामुळे फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमधील लांब पडल्याच्या बस रद्द झाल्या आहेत. नंदुरबारपासून मुंबई, नाशिक, पंढरपूर, पुणे, औरंगाबाद, नगर या भागात बस जात असतात. मात्र या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बस गाड्या रद्द होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com