Nandurbar Lok Sabha : मोबाईल आणल्यास थेट कारवाई; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात बंदी

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. नंदुरबार जिल्ह्याकरिता देखील याच दिवशी मतदानाची प्रक्रिया होत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे
Nandurbar Lok Sabha
Nandurbar Lok SabhaSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. या टप्प्यात नंदुरबार (Nandurbar) लोकसभा मतदार संघाचा समावेश असून त्यासाठी प्रशासन सज्ज झालेला आहे. उद्या होत असलेल्या मतदानादरम्यान मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल आणल्यास थेट कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिले आहेत.   

Nandurbar Lok Sabha
Eknath Khadse News : शेवटपर्यंत राजकीय संन्यास नाही; एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. नंदुरबार जिल्ह्याकरिता देखील याच दिवशी मतदानाची प्रक्रिया होत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहेत. आज सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्य रवाना झाले आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मतदानाच्या अनुषंगाने काही सूचना देखील दिल्या आहेत. 

Nandurbar Lok Sabha
Jalgaon News : सुट्यांमध्ये मामाच्या घरी आला; खेळता खेळता घरात जात उचलले टोकाचे पाऊल

पोलिसांकडून होणार तपासणी 

यातच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदान प्रतिनिधींना देखील मोबाईल न वापरण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या मतदारांची देखील तपासणी केली जाणार आहे. यासोबतच मतदान केंद्रात मतदारांनी मोबाईल वापरल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com