Priyanka Gandhi Rally: नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!

Nandurbar Loksabha Election 2024: या सभेमध्ये प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपल्या आजी इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) जुन्या आठवणी सांगितल्या. या सोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली.
नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Priyanka Gandhi RallySaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची नंदूरबार लोकसभा मतदार संघामध्ये आज प्रचारसभा पार पडली. महाविकास आघाडीचे नंदूरबारमधील उमेदवार गोवल पाडवी (Goval Padavi) यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपल्या आजी इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) जुन्या आठवणी सांगितल्या. या सोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली.

आजीच्या जुन्या आठवणींना उजाळा -

प्रियांका गांधी यांनी आजीसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, 'माझी आजी इंदिरा गांधी नंदुरबारला यायची. जेव्हा निवडणूक असायची तेव्हा प्रचाराची सुरुवात ती नंदुरबार जिल्ह्यातूनच करत होती. तिचे आदिवासी समुदायासोबत खूपच चांगले नाते होते. हे असे नाते होते ज्यामध्ये तुमचा पूर्ण आदर केला जात होतो. ती नेहमी म्हणाची तुमची संस्कृती ही जगातील सर्वात चांगली आणि मजबूत संस्कृती आहे. ती इकडे आल्यानंतर तुमच्या जीवनातील समस्या समजून घ्यायची.'

नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Pune Loksabha: पुण्याचा गड राखण्यासाठी भाजपचे दिग्गज मैदानात! देवेंद्र फडणवीसांनी ठोकला तळ; मध्यरात्री मोठी खलबतं

इंदिराजींनी आदिवासींनी दिलेल्या वस्तू ठेवल्या सांभाळून -

तसंच, 'तुम्ही नेहमी ती इकडे आल्यानंतर तिला काही तरी बनवून वस्तू द्यायच्या. त्या सर्व वस्तू आजही तिच्या घरात ठेवलेल्या आहेत. राहुल आणि मी लहान असताना ती आम्हाला या सर्व वस्तू दाखवायची आणि त्या कठून आल्या आहेत हे सांगायची. तुम्ही दिलेली टोपली देखील ती सांभाळून आपल्या खोलीमध्ये ठेवायची. तिच्याकडून माझी आई सोनिया गांधी ही देखील तुमच्या संस्कृती आणि तुमचा आदर करण्यास शिकली.', असे प्रियांका गांधींनी सांगितले.

नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Maharashtra Politics: परळीत धनंजय मुंडेंची भर पावसात सभा; बहिणीच्या प्रचारासाठी भाऊ भिजला; बीडमधील समीकरणं बदलणार?

इंदिरा गांधींनी आदिवासींसाठी काय केले? -

प्रियांका गांधींनी यावेळी इंदिरा गांधी यांनी आदिवासी समाजासाठी काय काय केले हे देखील या सभेमध्ये सांगितले. त्या म्हणाल्या की, 'इंदिरा गांधींनी तुम्हाला जल, जंगल आणि जमिनीवर अधिकार दिला. त्यांनी संविधानाला नेहमीच मजबूत ठेवले. नेहमी तुमच्या अधिकारासाठी लढल्या. जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा त्या तुमच्यामध्ये आल्या आणि तुमचे अधिकार आणि समस्या सोडवण्याचे काम केले.'

नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Sharad Pawar Speech: 'तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ', PM मोदींच्या ऑफरवरुन शरद पवारांचा टोला

काँग्रेसने बनवलेले कायदे -

या सभेत प्रियांका गांधींनी काँग्रेसने आदिवासींसाठी बनवलेल्या कायद्यांचा पाढा वाचून दाखवला. 'काँग्रेसच्या काळात एससी, एसटी अत्याचार निवारण कायदा बनले गेले. तुमच्यावर अत्याचर झाले तर कडक कारवाई केली गेली. पैसा कायदा देखील आम्ही बनवला. माझ्या वडिलांनी जो पंचायत राज कायदा लागू केला त्यामुळे तुमचे अधिकार आणखी मजबूत झाले. त्यानंतर सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांच्यासोबत फॉरेस्ट राइट अॅक्ट बनवला. त्यामुळे तुम्हाला जंगलावर आपला पूर्वीचा अधिकार मिळाला. नंदूरबारमधूनल मनरेगाचा कार्यक्रम सुरू झाला. यामुळे तुम्हाला रोजगार मिळाला.' , असे त्यांनी सांगितले.

नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Breaking News: प्रचार रॅलीत तुफान राडा! महायुती- ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; मनसे अन् २००च्या घोषणा| पाहा VIDEO

राहुल गांधींची पायी यात्रा -

प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, 'माझा भाऊ राहुल गांधी आज देशातील एक मात्र नेता आहे. ज्याने कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चार हजार किलोमीटरची पायी यात्रा केली. ही यात्रा तुमच्या गरजा समजून घेण्यासाठी होती. ही यात्रा तुमच्यामध्ये येण्यासाठी होती. आज आपल्या देशात असा एक नेता असेल जो तुमच्या समस्या समजण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी चार हजार किलोमीटरपर्यंत पायी चालला. चार महिनेपर्यंत चालला. त्यानंतर मणिपूर ते मुंबई दुसरी यात्रा काढली. आठ हजार किलोमीटर पायी चालला.याद्वारे त्याने तुमच्या समस्या समजून घेतल्या, तुमचे दु:ख आणि अडचणी समजून घेतल्या.'

नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Rohit Pawar News : राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही; अजित पवारांचं शिरूरमधील चॅलेंज रोहित पवारांनी स्वीकारलं

पीएम मोदींवर निशाणा -

यावेळी प्रियांका गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'भाजपची विचारधारा विपरीत आहे. त्यांची विचारधारा तुमच्या संस्कृतीला समजत नाही. तुमच्या संक्कृतीचा आदर करत नाही. संधी मिळाल्यानंतर ते तुमची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करतात. भाजपला काही समजत नाही आणि ते तुमचा आदर करत नाही. आदिवासींवर अत्याचार झाले तेव्हा भाजपचे सर्व नेते चूप राहिले. मणिपूर येथे अत्याचार झाले मात्र थांबवण्यासाठी पंतप्रधान गेले नाही. ते फक्त चूप राहिले.', अशी टीका प्रियांका गांधींनी केली.

नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!
Richest Candidates: लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार, तब्बल ५,७०५ कोटींची संपत्ती; कोण आहेत डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com