नंदुरबार : तोक्ते आणि निसर्ग वादळात दिले तेच जनतेला पोहचेले नाही. घोषित करतात पण पोहचवत नाही; अशा ठाकरे सरकाच्या पॅकेजवर जनता विश्वास ठेवेल का? तातडीच्या दहा हजारांची मदत देखील जनतेला मदत मिळाली नाही. त्यामुळे पॅकेजमधून प्रत्यक्षात जनतेला काय मिळेल, असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. (nandurbar-news-bjp-mla-ashish-shelar-press-conferance-target-thakrey-goverment)
आमदार शेलार म्हणाले, की मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते की मी पॅकेज नाही तर मदत देणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतःच्या शब्दाहून फिरले कि काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ अदाणीकडे हस्तांतराचा प्रस्ताव हा ठाकरे सरकानेच केला होता. ठराव संमत करतांना छत्रपतींचे नाव कमी न करता बाकी गोष्टी करण्याची काळजी सरकारने का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेचे आंदोलन हे टक्केवारीच आंदोलन असल्याची टिका करत अदाणी आणि शिवसेनेची यात मिलीभगत असल्याचा टोला लगावला आहे.
राऊतांवरही साधला निशाणा
पंतप्रधान मोदींच्या चहापाणावर प्रश्न उपस्थित करणाऱया खासदार संजय राऊतांवर देखील शेलांर यांनी टिकेची झोड उठवली. चहा नाश्तावर तयारी करणारा शिवसेना हा नविनच पक्ष आहे. जे चायपाणीवर जगता तेच पक्ष असे प्रश्न उपस्थित करतात असा टोला शिवसेनेला लगावत. मुख्यमंत्री कोणालाही भेटायला तयार नाही त्याच्याकडे सोडुन पंतप्रधानाच्या चायपाणीबाबत संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित करु नये.
कुपोषणावर चर्चा व्हायला हवी होती
नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील वाढलेल्या कुपोषणाच्या संख्येवर विधानसभेत चर्चा झाली पाहिजे होती. परंतु सत्ताधारी पक्षाच्या आडकाठी धोरणामुळे तसे झाले नाही. दुर्गम भागातील वाढलेली कुपोषणाची संख्या गंभीर व धोकेदायक असून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभा बाहेर खावटी अनुदान योजनेतील मुद्दे उपस्थित केले होते. कुपोषण वाढलेल्या भागातील दौरे करून भाजप मुख्यमंत्र्यांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवण्याचे काम करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.