Bachchu Kadu News: महाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठे; आमदार बच्चू कडू

Nandurbar News : महाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठे
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : मराठ्यांनी आता आंदोलन थांबवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह निकाल दिला असून मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी हा मराठा आहे. त्यात वेगळं सांगायची काही गरज नसून मराठासाठी आरक्षण (maratha Aarkshan) देण हा वेगळा भाग असला तरी माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा आहे. मात्र महसुली कुणबी आहे. माझ्याही टीसीवर मराठा होत. मात्र महसूली कुणबी असल्याने मी कुणबी झालो. मराठा हे नाव एका जातीचे, धर्माचे नाही. कोणत्या पंथाचा नाही. मराठा हे नाव एका मुलुखाच नाव आहे. महाराष्ट्रात जे जे राहतात ते सर्वच मराठे. चुकून त्यांनी मराठे लिहिलं म्हणून त्यांना आरक्षण भेटल नसल्याचे मत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केले. (Tajya Batmya)

Bachchu Kadu
Bachchu Kadu News : दिव्यांगांसाठी बच्चू कडूच सरकार विरोधात उभे; निधी खर्च होत नसल्याने दिला उपोषणाचा इशारा

दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केला आहे. सरकार हे घरकोंबडी सारखं आहे. घरात बसून राहतात; अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत बच्चू कडू म्हणाले संजय राऊतच्या टीकेला कोण विचारतय. 

तरच सर्वांना मदत 

दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात आमदार बच्चू कडू म्हणाले की दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही. स्टॅंडिंग शासन निर्णय असते. (Nandurbar) स्टॅंडिंग जीआर आपल्याकडे आहे. ते ३३ टक्क्यांचा वर नुकसान झाले तरच सर्वांना मदत भेटणार. वेगळा दुष्काळ जाहीर करण्याची नेहमी नेहमी गरज नाही. ३३ टक्के नुकसानीचे माहीती जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली तरच त्यांचे पंचनामे होऊन मदत होईल; अशी माहिती त्यांनी दिली. 

Bachchu Kadu
Shahrukh Film : शाहरूखचा जवान चित्रपट रिलीज होताच 'मालेगावचे शोले' भडकले, फॅन्सचा धुमाकूळ

दिव्यांगांसाठी चांगले धोरण आणणार 

दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन आतापर्यंत १३ जिल्ह्यांमध्ये दिवंगांच्या दारी हा कार्यक्रम झाला. आतापर्यंत ६५ हजार तक्रारी आल्या आहेत. त्यातील काही तक्रारी या धोरणात्मक असून यात घरकुलाची योजना धोरणात्मक करुन घ्यावी लागेल. ७५ टक्के योजना आपण नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या फंडातून वर्षाला ३ ते ४ लाख दिव्यांगांना मदत करतो. दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून एक धोरण आखण्यासाठी आम्ही या तक्रारी एकत्र करत असून ३ डिसेंबरपर्यंत चांगलं धोरण आणणार असून त्यात व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी कर्ज आणि मदत हे सरकार कडून दिले जाणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com