सागर निकवाडे
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची (Nandurbar) गैरसोय होत होती. याबाबत अपघातात नागरिकांच्या जीव धोक्यात असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. यानंतर (Health Department) आरोग्य विभागाकडून या ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. (Tajya Batmya)
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात १६ अपघाताची (Accident) नोंद झाली आहे. मात्र खांडबारा ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्स नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. रुग्णवाहिका मिळावी याबाबत वारंवार निवेदन देऊन तक्रार करून देखील १०८ ॲम्बुलन्स (Ambulance) उपलब्ध करून दिली जात नव्हती. इतकेच नाही तर दोन मोटरसायकलीच्या अपघातात वाट पाहून देखील ॲम्बुलन्स न आल्याने नाईलाजाने जखमींना ॲपे रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आल्याचे वास्तव समोर आले होते. याबाबत सां टीव्हीने बातमी दिली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
साम टीव्हीचे मानले आभार
साम टीव्हीने दिलेली ग्रामीण रुग्णालयाची बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाने त्वरित १०८ ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता रुग्णांना होणार त्रास थांबणार आहे. त्याबद्दल समस्त खांडबारा गाव परिसरातील नागरिकांनी साम टीव्ही चे आभार मानले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.