Nandurbar Mirchi Market: नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीचा ठसका; यंदा विक्रमी खरेदी- विक्री होण्याचा अंदाज

Nandurbar News: दरदिवशी जवळपास तीन ते चार हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
red chillies, nandurbar
red chillies, nandurbarsaam tv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार, ता. २४ नोव्हेंबर २०२३

Nandurbar Mirchi Market News:

नंदुरबार जिल्हा हा मिरचीचे आगार म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मिरचीचे उत्पादन घेतले जाते. नंदुरबार बाजार समिती मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरदिवशी जवळपास तीन ते चार हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र यावर्षी मिरचीची आवक जास्त असली तरी दर कायम असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार बाजार समितीमध्ये (Nandurbar Mirchi Market) ओल्या मिरचीला 3000 ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मिरचीची आवक वाढल्यानंतरही दर कायम असल्याने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे. आत्तापर्यंत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी 90 हजार क्विंटल मिरची खरेदी केली असून अजून हंगाम पाच महिने सुरू राहणार आहे.

त्यामुळे यावर्षी नंदुरबार बाजार समितीत मिरची खरेदी विक्रीची विक्रमी उलाढाल होणार आहे. नंदुरबार जिल्ह्याप्रमाणे शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातूनही मोठ्या प्रमाणात मिळतील नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहे बाजार समितीत 25 ते 26 व्यापाऱ्यांकडून या मिरचीची खरेदी होत असून योग्य दर दिला जात आहे.

red chillies, nandurbar
Ashok Chavan: मराठा आरक्षणाला विरोध असलेलं बनावट लेटरपॅड व्हायरल; अशोक चव्हाणांकडून पोलिसांत तक्रार दाखल

दरम्यान, यंदा होणारी मिरचीची आवक ही मागील वर्षाच्या तुलनेने समाधानी असून ओल्या मिरचीला ३ हजारे ते साडे सहा हजारांचा भाव मिळतोय. तसेच सुखी मिरची सात हजार ते १४ हजारापर्यंत विक्री होत आहे. आत्तापर्यंत बाजार समितीत ९० हजार क्विंटल मिरचीची आवक झाली असून यंदा विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

red chillies, nandurbar
CM Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, डाॅक्टरांचा विश्रांतीचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com