Chilli Price
Chilli PriceSaam tv

Chilli Price: मिरचीचे दर झाले कमी; मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत

Nandurbar News : मिरचीचे दर झाले कमी; मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत
Published on

सागर निकवाडे  
नंदूरबार
 : नंदुरबार जिल्हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जात असतो. येथे मोठ्या प्रमाणात मिरचीची (Nandurbar) आवक होत असते. सध्याच्या स्थितीत मिरचीची असल्याने मिरचीची आवक वाढली आहे. परंतु मिरचीच्या दारात घसरण झाली असल्याने उत्पादक शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. (Live Marathi News)

Chilli Price
Soybean Crop: सोयाबीनवर येलो मोझ्याकसह खोडकिडीचे आक्रमण; २० हजार हेक्टर क्षेत्राला फटका

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. सध्या हिरव्या मिरचीचा तोडणी हंगाम सुरू झाला असून, मिरचीचे दर कमी झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी मिरचीला चांगले दर मिळाल्याने यावर्षी देखील चांगला दर मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी हिरवी मिरची लागवड केली होती. मात्र हिरव्या मिरचीला बाजारात मिळणारा दर कमी असल्याने मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

Chilli Price
Beed News: सुवर्णपदक विजेता अविनाश साबळेचे जंगी स्वागत; पुष्पवृष्टी करत वाजत गाजत मिरवणूक

शेतकऱ्यांनी मिरचीवर केलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उद्भवले आहे आधीच मिरचीचे रोप फवारणी आणि तोडणीसाठी मजूर असा मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता खर्च निघणार का नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com