Beed News: सुवर्णपदक विजेता अविनाश साबळेचे जंगी स्वागत; पुष्पवृष्टी करत वाजत गाजत मिरवणूक

Beed News : सुवर्णपदक विजेता अविनाश साबळेचे जंगी स्वागत; पुष्पवृष्टी करत वाजत गाजत मिरवणूक
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाची मान उंचावणाऱ्या अविनाश साबळेला ग्रामस्थ डोक्यावर घेऊन नाचले. विशेष (Beed) म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या मिरवणूक गावातील सर्व महिला पुरुष सहभागी झाले होते. गावात (Asian Games) अक्षरशः दिवाळी साजरी झाल्याचा अनुभव या निमित्ताने आला होता. (Breaking Marathi News)

Beed News
Yawal Crime News : मस्करीतून उद्भवले भांडण: क्षुल्लक कारणावरून केली हत्या 

चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३ हजार मिटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक व ५ हजार मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक (Ashti) अविनाश साबळेने जिंकले. यामुळे भारत देशाचे नाव उंचावले. एशियन गेममध्ये सुवर्णपदक विजेता ऑलम्पिक खेळाडू अविनाश साबळे यांचे गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. बीडच्या मांडावा गावाचा भूमिपुत्र एक सुवर्ण व एक रौप्य पदक घेवून गावात आल्यावर गावकऱ्यांकडून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

Beed News
Soybean Crop: सोयाबीनवर येलो मोझ्याकसह खोडकिडीचे आक्रमण; २० हजार हेक्टर क्षेत्राला फटका

सायंकाळी तो आष्टी तालुक्यातील मांडवा येथे आपल्या गावी आला. यावेळी ग्रामस्थांनी त्याची वाजत गाजत, फुलांची उधळण करत गावभर मिरवणूक काढली. यावेळी सत्काराला उत्तर देताना अनेक पदके आपल्या देशाला मिळवून द्यायचे आहेत. माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही. २०२३ मध्ये मिळालेली पदके जबाबदारी वाढविणारे आहेत; अशा प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com