Ashok Chavan: मराठा आरक्षणाला विरोध असलेलं बनावट लेटरपॅड व्हायरल; अशोक चव्हाणांकडून पोलिसांत तक्रार दाखल

Ashok Chavan News: मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध असल्याचा आशय त्या लेटरपॅडवर आहे. अशोक चव्हाण यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Ashok Chavan
Ashok Chavansaam tv
Published On

नांदेड संजय सूर्यवंशी

Maratha Reservation:

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारसह विरोधी पक्षनेते देखील प्रयत्न करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता काँगेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव चर्चेत आलंय. कारण त्यांच्या नावाने बनावट लेटरपॅड तयार करून त्यावर आरक्षणाबाबत खोटा आशय लीहण्यात आलाय. तसेच त्यावर चव्हाण यांची खोटी स्वाक्षरीही करण्यात आली आहे.

Ashok Chavan
Special Report | Maratha Resrvation : मराठ्यांचं मागासलेपण तपासायला सहा महिन्यांचा लागणार काळ

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध असल्याचा आशय त्या लेटरपॅडवर आहे. अशोक चव्हाण यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने हे पत्र लिहण्यात आल्याचं अशोक चव्हाण म्हणालेत. सतेच पोलिसात (Police) तक्रार दाखल करत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी त्यांनी केलीये.

याधीही चव्हाणांचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लेटरपॅड वापरून मराठा आरक्षणाविरोधीचे पत्र व्हायरल करण्यात आले होते. याबाबत 20 फेब्रुवारी 2023 रोजी अशोक चव्हाणांनी दिलेल्या तक्रारी नुसार नांदेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा असाच पप्रकार घडला. आपल्या राजकीय विरोधकांकडून हा प्रकार सुरू असून आपल्या विरोधात आणखी काही षडयंत्र रचण्यात आल्याची शक्यता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीये.

आगामी काळात निवडणुका असून गैरसमज निर्माण करून बदनामी करण्याचे हे काम असल्याचे अशोक चव्हाण म्हणालेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापललें आहे. आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तर सरकारमार्फत ही मुदत २ जानेवारीपर्यंत असल्याचं म्हटलं जातंय. मुदतीवरून अद्यापही सामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम आहे.

Ashok Chavan
Ahmednagar Crime News : अख्खा महाराष्ट्र हादरला! पारनेरमध्ये चिमुकल्यासह आईची कारने चिरडून हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com