Satpura Fire: 'सातपुडा' जळतोय! डोंगराला भीषण आग, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक

Nandurbar Forest Fire: नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील डोंगरांना भीषण आग लागली. या आगीमध्ये १५ ते २० किलो मीटरपर्यंत जंगल जळून खाक झाले. यामध्ये अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
Satpura Fire: 'सातपुडा' जळतोय! डोंगराला भीषण आग, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक
Satpura FireSaam Tv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. धडगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत जंगलाला आग लागली असून झाडं जळून खाक झाली आहेत. गेल्या ३ दिवसांपासून डोंगरांना आग लागत असल्याची माहिती समोर आली आहे. डोंगरांनाा लागलेल्या आगीत अनेक जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली.

सातपुडा पर्वतरांगेतील डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे पाडे आणि वस्त्या असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. डोंगराला लागलेला आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत पण ते देखील अपयशी ठरत आहेत. कारण आग वाढतच चालली आहे.

Satpura Fire: 'सातपुडा' जळतोय! डोंगराला भीषण आग, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक
Nandurbar Fire : वनव्याने संसाराची राखरांगोळी; जळालेले घर पाहून आदिवासी कुटुंबाचे अश्रू अनावर

झाडापासून कोळसा मिळावा यासाठी आग जाणूनबुजून लावली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. वनमाफियांकडूनच या आग लावल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. असे देखील सांगितले जात आहे की, सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलामध्ये अज्ञातांकडून आग लावून सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे. या घटनेमुळे जंगलातून मिळाऱ्या मौल्यवान वनस्पती, औषधं नामशेष होत चालली आहेत.

Satpura Fire: 'सातपुडा' जळतोय! डोंगराला भीषण आग, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक
Nandurbar News : गावातल्या विकास कामावरुन दोन गट भिडले; पोलीस स्टेशनमध्येच राडा

सातपुडा पर्वतरांगांमध्ये हरीण, ससा, बिबट्या, माकड, अस्वल, कोल्हा, लांडगा यासारखे प्राणी आढतात. जंगलाला आग लागल्यामुळे यामध्ये यासारख्या अनेक प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वनमाफियांच्या या कृत्यामुळे प्राण्याचे वास्तव्य नष्ट होत चालले आहे. अशामध्ये पर्यायवरण प्रेमींकडून जंगल वाचवण्याची मागणी केली जात आहे.

Satpura Fire: 'सातपुडा' जळतोय! डोंगराला भीषण आग, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक
Nandurbar Water Crisis : मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यात जलसंकट; वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com