Pune Fire: पुण्यात इलेक्ट्रिक बाईकच्या कंपनीला भीषण आग, २००० दुचांकीचे साहित्य जळून कोळसा

Massive Fire at Pune And Nashik: पुणे आणि नाशिकमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.
pune fire
pune fire Saam Tv
Published On

पुणे: कात्रज-गुजारवाडी रोड येथील साई इंडस्ट्रियल एरिया मधील भूषण एंटरप्रायझेस या इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग संध्याकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गंगाधाम, कात्रज, कोंढवा बुद्रुक येथून दहा अग्निशमन बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाले.

pune fire
Pune News: कुणी कपडे फाडले, कुणी झिंज्या उपटल्या, महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारी; VIDEO व्हायरल

या आगीत १५० अर्धवट तयार दुचाकी जळून खाक झाल्या असून, २,००० दुचाकीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

pune fire
Pune Corporation Budget : पुणेकरांना दिलासा, कोणतीही करवाढ नाही, १२६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

नाशिक येथील फर्निचरच्या गोदाममध्ये भीषण आग

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील साईनाथ नगर येथील डी एम फर्निचर च्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले. आगीचा भडका इतका तीव्र होता की बाजूच्या गॅरेजपर्यंत पोहोचला आणि त्यामध्ये असलेल्या काही वाहनांचेही नुकसान झाले.

pune fire
Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, २ दुचाकीची समोरासमोर धडक, जावाई-सासऱ्याचा जागीच मृत्यू

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण सहा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून, अग्निशमन दलाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com