सागर निकवाडे, साम टीव्ही नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. नाल्यात आलेल्या पुरात पडून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात पडल्यामुळे सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. आपण या घटनेबाबत सविस्तर जाणून घेवू या.
नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Baby Death After Falling Canal Flood) झालाय. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आल्याचं समोर आलंय. मुसळधार पावसामुळे शहादा तहसील कार्यालयाजवळ असलेल्या भेंडवा नाल्यात एक सहा महिन्याचं बाळ वाहून गेल्याची घटना घडली. दुचाकीवरील ताबा सुटला अन् सहा महिन्यांचा चिमुकला आईच्या हातातून सुटून पुराच्या पाण्यात पडल्याची माहिती मिळतेय.
मुसळधार पावसात आपल्या पत्नी आणि सहा वर्षीय बालकासोबत मनोज नावाचा व्यक्ती दुचाकीवरून घरी चालला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह (Nandurbar News) वाढला. त्यामुळे मनोज भिल नावाच्या व्यक्तीचा त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे पत्नी खाली पडली. पत्नीचा हातात असलेलं सहा महिन्याचं बाळ नाल्याच्या पाण्यात वाहून गेलंय.
या दोघा पतीपत्नीनी चिमुकल्याला शोधण्याचे अनेक प्रयत्न (Rain News) केले. मात्र, ते निष्कळ ठरले दुसऱ्या दिवशी सकाळी नाल्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात बालकात मृतदेह आढळून आला. बाळाचा मृ्त्यू झाल्यामुळे मनोज आणि त्याच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात (Flood Update) आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.