सागर निकवाडे, साम टीव्ही प्रतिनिधी
नंदूरबार : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. नंदूरबारमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. नंदूरबारमध्ये भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींना नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात चारचाकी वाहनांसह मोटरसायकलींचा चुराडा झाला आहे.
ऐन दिवाळीत पाच जणांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.
जळगावात धावत्या रेल्वे एक्स्प्रेसने ७ ते ८ गायींना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन ते चार गायींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर काही गायी जखमी झाल्या आहेत. रेल्वे एक्स्प्रेस जळगाव शहरातून जात असताना बजरंग बोगद्याजवळ सात ते आठ गायींना धडक दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी तसेच जवान घटनास्थळी पोहोचले.
या घटनेमुळे दहा ते पंधरा मिनिटं पवन एक्स्प्रेस थांबली होती. त्यानंतर पुढे मार्गस्थ झाली. अपघातानंतर प्रशासनाने मृत गायींना रेल्वे रुळावरून उचलून बाजूला करण्याचं काम सुरु केलं. आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.