अजय सोनवणे, नाशिक प्रतिनिधी
Nashik Latest News : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गावकऱ्यांनी प्रेम प्रकरणाला विरोध केला, त्यामुळे महिलेने प्रियकरासोबत टोकाचे पाऊल उचलले. नाशिकमधील नांदगावमध्ये १६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून पोलिसांनी कारवाई केली.
प्रेमसंबंधांच्या विरोधामुळे महिलेने प्रियकरासह आयुष्य संपवले. महिलेने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्याआधारे आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या १६ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील प्रेमी युगुलाने आयुष्याचा शेवट केला. नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून दिले. ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर श्री.शनिदेव मंदिराजवळ घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली १६ जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे तिच्या गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. त्यांना वारंवार 'आत्महत्या करा ' अन्यथा ठार मारू अशी धमकी दिली. वारंवार येणाऱ्या धमकी अन् मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
तुमची बहीण मारली, सुसाईड नोटमध्ये काय?
आमदार साहेब, या लोकांनी तुमची बहीण मारली. आत्महत्यापूर्वी महिलेची भावनिक सुसाइड नोट समोर आली आहे. मनमाड पोलिस ठाणे आणि आमदार सुहास कांदे यांच्या नावे सुसाइड नोट लिहून दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. प्रेम करणं हा गुन्हा नाही, आम्ही कुणाला त्रास दिला नाही. आम्हाला मरायचं नव्हतं, जगण्याची खूप इच्छा होती. आमदार साहेब, संजय पवार आणि अधिकारी आमच्या बाजूने आहेत. तुम्हाला मारून टाकलं तरीही कुणी आमचं वाकड करणार नाही, अशी धमकी संबंधितांनी दिल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.