रात्री आक्रित घडलं; संततधारेमुळे भिंत खचली, गाढ झोपेत वृद्ध दाम्पत्यांच्या अंगावर पडली; जागीच मृत्यू

Elderly Couple Dies After Wall Collapse: नांदेडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे कच्च्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. कोटबाजार गावात रात्री उशिरा ही घटना घडली.
Elderly Couple Dies After Wall Collapse
Elderly Couple Dies After Wall CollapseSaam Tv News
Published On
Summary
  • नांदेडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे कच्च्या घराची भिंत कोसळली.

  • या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

  • कोटबाजार गावात रात्री उशिरा ही घटना घडली.

  • घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

संजय सूर्यवंशी, साम टिव्ही

नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पती पत्नीच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. नांदेडमधील विविध भागांमध्ये संततधार सुरू आहे. यामुळे घरातील कच्च्या मातीची भिंत कमकुवत झाली. यामुळे रात्री सतत पडणाऱ्या पावसामुळे भिंत कोसळली आणि जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.

शेख नासेर शेख आमीन आणि त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हे जोडपं नांदेडच्या कंधार तालुक्यातील कोटबाजार गावातील रहिवासी होते. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Elderly Couple Dies After Wall Collapse
सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? पाहा लेटेस्ट दर

सतत पडणाऱ्या पावसामुळे नांदेडमधील गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, आता या पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटबाजार गावात जोडप्याचं घर होतं. मात्र, त्यांच्या घराची भिंत कमकुवत झाली होती. रात्रीच्या सुमारास सतत पडणाऱ्या पावसामुळे भिंत कमकुवत झाली.

Elderly Couple Dies After Wall Collapse
पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

काही क्षणात रात्रीच्या गाढ झोपेत जोडप्याच्या अंगावर भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगावर भिंत कोसळल्यामुळे वृद्ध दाम्पत्यांनी जागीच प्राण सोडले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com