Nanded News : मासेमारी करण्यासाठी गेले अन् अनर्थ घडला; तीन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

Nanded Latest News : पोचरा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे घडली.
Nanded Latest News
Nanded Latest NewsSaam TV
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

पोचरा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Nanded Latest News
Weather Alert : देशातील 22 राज्यांना आज पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही भाऊ नांदेड शहरातील (Nanded News) नवी आबादी परिसरातील रहिवासी होते. मोलमजुरीच्या कामासाठी ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे गेले होते. दहीहंडीच्या दिवशी कामाला सुट्टी असल्याने ते मासे पकडण्यासाठी पोचरा नदीत गेले.

यातील एक तरुण मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोन भावंडांनी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु कोणालाही पोहता येत नसल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. बचाव पथकाच्या मदतीने तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. नदीपात्रात बुडून तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याने नवी आबादी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Nanded Latest News
Jayakwadi Water Level : जायकवाडी धरण 4 दिवसातच निम्मं भरलं, मराठवाड्याला मोठा दिलासा; पाहा धरणातील आजचा पाणीसाठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com