Nanded Shiv Sena : शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार? आगामी निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग

Nanded News : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणूक मागील तीन- चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. अर्थात या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज सुरु आहे
Nanded Shiv Sena
Nanded Shiv SenaSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: मागील तीन चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज सुरु आहे. निवडणूक होण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाने तयारी सुरु केली आहे. नांदेड जिल्ह्यात त्या संदर्भात बैठका देखील घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणूक मागील तीन- चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. अर्थात या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज सुरु आहे. निवडणुका लागण्याबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने अखेर उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देत चार महिन्यात निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. 

Nanded Shiv Sena
Vitthal Mandir : भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सुरक्षा व्यवस्था अलर्ट; तपासणी करूनच भाविकांना प्रवेश

शिवसेनेच्या नांदेडमध्ये बैठका 

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागल्याचे दिसून येत आहेत. नांदेडमध्ये शिवसेनेने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर हे उपस्थित होते. 

Nanded Shiv Sena
Akola Crime : दुकानात घुसून चतुराईने दागिने चोरी; सहा तासात चोरीचा उलगडा, महिला ताब्यात

तर शिवसेनेचाही स्वबळाची नारा 

येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याची आमची इच्छा आहे. परंतु महायुतीतील काही घटक पक्ष जर स्वबळाचा नारा देत असतील; तर आम्ही देखील आमची ताकद या जिल्ह्यात दाखवू. या निवडणुका स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची भूमिका शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com