Girish Mahajan News : उलट पवारांनीच शिवसेना संपविली; जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप

Nanded News : महायुतीवर बोलताना राज्यातील तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत; असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला होता
Girish Mahajan Jayant Patil
Girish Mahajan Jayant PatilSaam tv

संजय सूर्यवंशी
नांदेड
: शिवसेना शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या माध्यमातून चालवली आणि शरद पवार यांनीच शिवसेना संपवली; असा गंभीर आरोप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. दरम्यान आमच्या कडे असा प्रकार नाहीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सक्षम आहेत; असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. (Tajya Batmya)

Girish Mahajan Jayant Patil
Nandurbar News : घरात साठवून ठेवलेला १ लाख ११ हजार किमतीचा गांजा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

राज्यात (BJP) भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती आहे. या महायुतीवर बोलताना राज्यातील तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हेच चालवत (Nanded) आहेत; असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतीउत्तर देत गंभीर आरोप केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girish Mahajan Jayant Patil
Ration Shop : रेशन सोबत दिलेल्या साड्या महिलांनी केल्या परत; जव्हार तहसीलमध्ये धडक

कोणी कुणावर कुरघोडी करत नाही 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दोन्ही सक्षम आहेत. आमच्या महायुतीतील तिन्ही पक्ष एकमताने चालत आहेत. कोणी कुणावर कुरघोडी करीत नाही. उलट शरद पवार (Sharad Pawar) हे उध्दव ठाकरे यांना चालवत होते. म्हणून जयंत पाटील यांना अस वाटतं आहे का? असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी जयंत पाटील यांना केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com