Nandurbar News : घरात साठवून ठेवलेला १ लाख ११ हजार किमतीचा गांजा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

Nandurbar News : आदिवासी भागात पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली जात असते. अनेकदा पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देखील अवैधपणे लागवड केली जात आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. तसेच (Nandurbar) अवैध धंद्यांवर देखील कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. यात घरात साठवून ठेवलेला तब्बल १५ किलो गांजा (Police) पोलिसांनी जप्त केला आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News
Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या आदिवासी भागात पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली जात असते. अनेकदा पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देखील अवैधपणे लागवड केली जात आहे. दरम्यान लोकसभेच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर आळा बसवण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. अशीच कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Unseasonal Rain : वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी; सकाळपासून ऊन सावलीचा खेळ

धडगाव पोलिसांना (Dhadgaon Police) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी धडगाव तालुक्यातील अमला गावात तपासणी केली. या तपासणीत करमसिंग पावरा या व्यक्तीने आपल्या घरात मानवी शरीराला घातक असणारा गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या गांजावर पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण यांनी धाड टाकली. यात १ लाख ११ हजार रुपयांचा एकूण १५ किलोंचा गांजा धडगाव पोलिसांनी जप्त केलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com