Unseasonal Rain : वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी; सकाळपासून ऊन सावलीचा खेळ

Wardha News : राज्यातील काही भागात २- ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहण्यास मिळाले.
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. यात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. (Wardha) मात्र ढगाळ वातावरणामुळे वाढत्या उष्णतामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Breaking Marathi News)

Unseasonal Rain
Shirpur Crime News : पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या; पतीसह सासरा ताब्यात

राज्यातील काही भागात २- ३ दिवस अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहण्यास मिळाले.  वर्धा जिल्ह्यासह विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता.   त्यानुसार वर्धा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून दुपारच्या वेळी पावसाळा सुरवात झाली. काही भागात (Lightning Strike) विजांच्या कडकडाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain
Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय; पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची कारवाई

शेतकरी चिंतेत 

आज सकाळपासून ढगाळ वातावरणाने (Farmer) शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही शेतकऱ्यांनी गहू सवंगणी करून ठेवलं आहे. तर काही शेतकरी गहू काढत आहे. यामुळे अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील तीन दिवस हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे वाढत्या उष्णतामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com