Ration Shop : रेशन सोबत दिलेल्या साड्या महिलांनी केल्या परत; जव्हार तहसीलमध्ये धडक

Jawhar News : राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडीवाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडीवाटप करण्याचा निर्णय घेतला
Palghar Jawhar News
Ration ShopSaam tv
Published On

फय्याज शेख 

जव्हार : सरकारी विभागाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक अंत्योदय लाभार्थ्याला मार्च महिन्यात साड्यांचे वाटप करण्यात येत आहेत. दरम्यान (Ration) रेशन सोबत मिळालेल्या या साड्या महिलांनी परत केल्या आहेत. जव्हार तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालयात येत साड्या परत केल्या. (Live Marathi News)

Palghar Jawhar News
Vijay Wadettiwar : लग्नासाठी त्यांनी हुंडा मागितला...; प्रकाश आंबेडकरांच्या टिकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्युत्तर

राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडीवाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय (Ration Card) रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडीवाटप करण्याचा निर्णय घेतला असून मार्चमध्ये या साड्या वाटप करण्यात आल्या. त्यानुसार जव्हार तालुक्यातील लाभार्थी महिलांना देखील साड्यांचे वाटप करण्यात आले होते. परंतु आम्हाला फुकटच्या साड्या नको, त्या खरेदी करण्यासाठी सक्षम बनवा’ असं म्हणत पालघर (Palghar) जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन  दिलेल्या साड्या परत केल्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Palghar Jawhar News
Nandurbar News : घरात साठवून ठेवलेला १ लाख ११ हजार किमतीचा गांजा जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

आमच्या मेहनतीचे पैसे द्या 

जव्हारमधील महिलांच्या या आंदोलनाने संपूर्ण जिल्याचे लक्ष वेधलं आहे. आम्ही काय भिकारी आहोत काय? असा सवाल आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी केला. तसेच "रोजगार हमी योजनेचे काम केले. दहा-दहा मस्टर भरलेत. चार- पाच महिन्यांपासून त्यांचे पैसे दिले नाहीत. आमच्या मेहनतीचं पैसे आम्हाला द्या. या साड्या घेऊन काय करू, आम्ही काय भिकारी आहोत का? असा संताप आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com