Nanded News
Nanded NewsSaam tv

Nanded News : चोरीला गेलेल्या साडेतेरा लाखाचे १०२ मोबाईलांचा लागला शोध; परत नेण्याचे पोलिसांकडून आवाहन

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीसांचे एक पथक निर्माण करण्यात आले होते.
Published on

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्या होत्या. याबाबत पोलिसात (Nanded) तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावरून पोलिसांनी शोध सुरु केला असता १०२ चोरीचे मोबाईल पोलिसांनी (Police) हस्तगत केले आहेत. यानंतर हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. (Breaking Marathi News)

Nanded News
Ration Subsidy : रेशन ऐवजी अनुदानाचे पावणे पाच कोटी जमा; बीड जिल्ह्यात २४ हजारावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम

नांदेड जिल्ह्यात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीसांचे एक पथक निर्माण करण्यात आले होते. सायबर शाखेने तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या कारवाया करत तब्बल १०२ मोबाईल (Mobile) फोन शोधून जप्त केले. १३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे हे मोबाईल फोन आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nanded News
Jalgaon Crime News: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आज ५४ नागरिकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. मिळालेल्या सर्व मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकाची यादी नांदेड पोलिसांच्या वेबसाईटवर आहे. ज्यांचे मोबाईल असतील त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून मोबाईल नेण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com