

नांदेड : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ( ता. २८ ) फळरोप वाटिका धनेगाव येथे एक हजार बांबूंची लागवड करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात बांबू लागवड विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केला. Nanded-Launch -of -special -bamboo- planting- campaign-Planting -of 1,000- seedlings
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व फळ रोपवाटिकांमध्ये बांबूची लागवड करण्यात येणार आहे. तसेच शेतकर्यांना शेतीमध्ये बांबू उत्पादनासाठी विविध योजनेतून प्रोत्साहन दिले जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी व शेतकर्यांना उत्पादनाचे साधन म्हणून बांबूची लागवड कमीत कमी १० टक्के क्षेत्रावर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले व काही शेतकर्यांना लागवडीसाठी बांबूची रोपे देण्यात आली.
हेही वाचा - राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!
वृक्षमित्र फाऊंडेशन या स्तुत्य उपक्रमात कृषी विभागासोबत काम करीत आहे. या मोहिमेत वृक्षमित्रांनी दोन वर्षांपूर्वी श्रमदानाने बेडवर तयार केलेली बांबूची रोपे भेट देण्यात आली आहेत. या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकले, कृषी अधिकारी श्री. चामे, श्री. सानप तसेच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, संजय गौतम, प्रल्हाद घोरबांड, शैलेश क्षीरसागर, नरेश यन्नावार, कृपालसिंघ हुजुरिया या सर्वांनी रोपांची लागवड केली.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.