नांदेडमध्ये भंयकर दुर्घटना! महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ४ चिमुरड्यांचा मृत्यू

Nanded accident news : नांदेडमध्ये महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ४ चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. देगलूर नाका परिसरातील दुर्दैवी घटनेने शहर हादरले.
Nanded accident news
Nanded accident news Saam
Published On

संजय सूर्यवंशी | नांदेड प्रतिनिधी | साम टीव्ही

नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देगलूर नाका परिसरात महापालिकेच्या वतीने नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ४ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने दुपारच्या वेळी मुले घराबाहेर खेळण्यासाठी पडली होती. कडाक्याच्या उन्हामुळे ही मुले खेळता खेळता देगलूर नाका भागातील नाल्याजवळ गेली. महापालिकेच्या वतीने या परिसरात नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने खेळता खेळता ही मुले खड्ड्यात पडली आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Nanded accident news
Vande Bharat Sleeper : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, सोलापूरकरांनाही फायदा, वाचा तिकीट अन् थांबे

मिळालेल्या माहितीनुसार, मयत झालेली मुले ७ ते १० वर्ष वयोगटातील आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. एकाच वेळी चार चिमुरड्यांचा जीव गेल्याने नांदेड शहरारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nanded accident news
संभाजीनगर हादरले! हायकोर्टाच्या वकिलाची निर्घृण हत्या, मध्यरात्री रस्त्यात गाठले अन् सपासप वार

प्रशासनाचा हलगर्जीपणा?

नाल्याचे काम सुरू असताना खड्ड्यांभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या या हलगर्जीपणामुळेच निष्पाप मुलांचा जीव गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Nanded accident news
Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com