सावकारांची फायनान्स दुकानं लोकांनी फोडली; नांदेडमध्ये क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक

Farmers' Organisation Vandalises Bajaj Finance: राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांची मुजोरी वाढत चाललीये. अशातच आता शेतकरी संघटनांचा संयम सुटताना दिसतोय. नांदेडमध्ये शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत कार्यालयाची तोडफोड केलीये. त्यामुळे कंपन्यांची ही वसुली सहनशक्तीच्या पलीकडे जातोय का?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
NANDED FARMERS PROTEST
NANDED FARMERS PROTESTsaam tv
Published On: 

राज्यातल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची वाढत्या वसुलीखोरीविरोधात शेतकऱी कमालीचे आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये हप्तेवसुलीच्या तगाद्यानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं थेट फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयाला धडक दिली. यावेळी या संतप्त आंदोलकांनी बजाज फायनान्स आणि श्रीराम फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. एव्हंढच नव्हे तर नांदेडमधला हा प्रकार हा फक्त ट्रेलर असल्याचं सांगत संघटनेनं फायनान्स कंपन्यांना इशारा दिलाय..

खरंतर, ग्रामीण भागात विविध ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून हप्तेवसुलीसाठी छळ करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललीये. एव्हंढच नव्हे तर शेतात पीकं उद्ध्वस्त झाल्यानं आणि हाताला काम नसल्यानं कंपन्यांचे हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांना घरं विकण्याची वेळ आलीये. तर याच नांदेडमध्ये कंपन्यांच्या सावकारी जाचाला कंटाळून एका शेतकऱ्यानं थेट फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच जीवन संपवलं.

म्हणूनच की काय आता कंपन्यांच्या मुजोरीला रोखण्यासाठी शेतकरी संघटनांनी कायदा हातात घेतल्याचं दिसतंय. कारण कंपन्यांची वसुलीखोरी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याचं दिसतंय. त्यामुळे यावर सरकारनं योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा असाच उद्रेक होत राहणार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.