
आंब्याचं सीजन सुरू झाल आहे. हापूस,दसेरी, केसर, गावरान यासह विविध प्रकारचे आंबे आता बाजारात उपलब्ध होत आहेत.परंतु सध्या नांदेडमध्ये एका अंब्याची चर्चा जोरदार सुरु आहे. या आंब्याची चर्चा होणं देखील साहजिक आहे. कारण या एका आंब्याची किंमत आयकून तुम्ही थक्क देखील व्हाल. मियाझाकी असं या जापनीज आंब्याचे नाव आहे.
जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून या आंब्याची ओळख आहे. या मियाझाकी या एका आंब्याची किंमत तब्बल 10 हजार रुपये एवढी आहे.नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावाच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याने या जापनीज आंब्याचा आपल्या खडकाळ माळरानावर यशवी प्रयोग केलाय. हा अंबा एव्हढा महाग का असावा याची कारण या आंब्यात साखरेचे प्रमाण कमी असून विविध आजारावर हा आंबा गुणगारी असल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.
दोन वर्षांपूर्वी नंदकिशोर गायकवाड यांनी फिलिपाईन्स येथून मियाझाकी नावाच्या आंब्याची दहा रोपे मागवली.योग्य पद्धतीने या आंब्याची लागवड करून आपल्या इतर आंब्यासारखीच या आंब्याची देखील योग्य संगोपन केलं. या वर्षी या आंब्याच्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली.नांदेडमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात या आंब्याची मोठी चर्चा झाली.नंदकिशोर गायकवाड यांच्या कडे 12 एकर माळरान जमीन आहे.
या माळरान जमिनीवर ते वेगवेगळे प्रयोग करतात. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या फळाच्या बागा आहेत. केसर, दसेरी, हापूस, राजापूरी यासह विविध प्रकारचे आंब्यांची झाडे आहेत. यातून त्यांना दरवर्षी चांगलं उत्पन्न देखील मिळतं.ऑनलाईन बाजारात मियाझाकी एका आंब्याला 10 हजार रुपये भाव मिळतं असून पुढच्या वर्षी या आंब्याची बाग वाढवणार असल्याची माहिती नंदकिशोर गायकवाड यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.