Zila Parishad School: नांदेड,धाराशिव, जालना आणि बीडमधील मुलांना मराठी वाचता येईना; ZP च्या शाळेतील धक्कादायक प्रकार

Zila Parishad School: मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमधील 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.
Marathawada Zila Parishad School
Zila Parishad SchoolSaam Tv
Published On

केंद्र सरकारने शिक्षणातील पद्धतीत सुधार करत ढकलगाडी बंद करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांना पाचवी आणि ८ वीच्या वर्गाच्या परीक्षेत पास व्हावे लागणार आहे. अशात राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांबाबत धक्कादायक बाब समोर आलीय. पहिली ते तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना साधं वाचता येत नाहीये. मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब विभागीय प्रशासनाने केलेल्या पाहणीअंती उघडकीस आलीय.

एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला असताना दुसरीकडे मात्र मराठवाड्यातून धक्कादायक बातमी समोर आलीय. मराठवाड्यातील ८ पैकी ६ जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नाहीये. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचीही चाचणी घेण्यात आली. तर जालना जिल्ह्यात पहिली ते तिसरी पर्यंतच्या जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाहीये.

Marathawada Zila Parishad School
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये प्राथमिक शाळेत पालकांचा गोंधळ; प्रार्थनेवर घेतला आक्षेप

पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची साक्षरता व संख्याज्ञान अभियानांतर्गत पाहणी करण्यात आली आहे, या पाहणीअंती ही माहिती समोर आलीय. जालना जिल्ह्यात पहिली ते तिसरी एकूण ६०९३० विद्यार्थी आहे त्यापैकी १९६६४ विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची माहिती या अहवालातून समोर आलीय.

Marathawada Zila Parishad School
No Detention Policy: पाचवी, आठवीतील 'ढकलगाडी' बंद; पाचवी-आठवीत पास व्हावचं लागणार!

मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी ही वाचता येईना असा अहवाल विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाला आहे.याच अहवालाचा रियालटी चेक साम टीव्हीने देखील केला आहे.यावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.दुर्दैव आहे हा विषय शिक्षकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही हा विषय गंभीर स्वरूपाचे आहेत.

जिल्हा परिषद शाळा असो की खाजगी शाळा असो संस्था चालक आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे.आशा पद्धतीने पुढची शिक्षण घेत नसेल,आणि शिक्षण मिळत नसेल तर याचे परिणाम दिसतात.हा विषय गंभीर आहे.सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला.परंतु शिक्षक आणि पालकांनी देखील हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे असे भाजप खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com