Kolhapur News : कोल्हापूरमध्ये प्राथमिक शाळेत पालकांचा गोंधळ; प्रार्थनेवर घेतला आक्षेप

Kolhapur News : शाळेत पालक गोंधळ करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील शाळेत पोहोचले होते
Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv
Published On

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: कोल्हापूर शहराजवळील जाधववाडी येथील प्राथमिक शाळेत आज पालकांनी गोंधळ घातला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून म्हटल्या जाणाऱ्या 'ए मत कहो खुदासे' या प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत शिक्षकांना जाब विचारलायं. यामुळे शाळेत बराच वेळ गोंधळ उडाला होता. 

कोल्हापूरच्या (Kolhapur News) जाधववाडी येथे प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर शाळेत ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी रोज 'ए मत कहो खुदासे' ही प्रार्थना म्हणत असतात. दरम्यान या प्रार्थनेमध्ये उर्दू शब्द असल्याने पालकांनी त्यावर आक्षेप घेतल्याचा प्रकार सकाळी शाळा (School) सुरु झाल्यानंतर घडला आहे. त्यामुळे शाळेसमोर नागरिकांची गर्दी जमली होती. 

Kolhapur News
Bachchu Kadu : वेळ आल्यास मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत; बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास

पोलिसांनी केली मध्यस्थी 

शाळेत पालक गोंधळ करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच शाहूपुरी (police) पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील शाळेत पोहोचले होते. त्यांनी पालकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पालक हे आपल्या तक्रारींवर ठाम होते. दरम्यान या प्रकाराबद्दल दोषी शिक्षकांना निलंबित करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

Kolhapur News
Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल; जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

शाळेने दिले लेखी पत्र 

तक्रार घेऊन येणाऱ्या पालकांनी शिक्षक मुलांना विविध प्रकारची शिक्षा देत असल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षकांना जाब विचारला. त्यामुळे या परिसरातील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होतं. दरम्यान पालकांची तक्रार आल्याने सदरची प्रार्थना शाळेत घेतली जाणार नसल्याचं लेखी पत्र शाळा प्रशासनाने पालकांना दिले आहे. तसचं इतर तक्रारीवरही कार्यवाही करण्याचं आश्वासन शाळा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com