No Detention Policy: पाचवी, आठवीतील 'ढकलगाडी' बंद; पाचवी-आठवीत पास व्हावचं लागणार!

No Detention Policy: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळेच्या नियमात सुधारणा केलीय. या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीची परीक्षा पास व्हावीच लागेल.
 No Detention Policy: पाचवी, आठवीतील 'ढकलगाडी' बंद;  पाचवी-आठवीत पास व्हावचं लागणार!
Published On

आता पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.यापुढे पाचवी आणि आठवीला नापास झालाय तर तुमचं वर्ष वाया गेलं समजा. कारण केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं ढकलगाडी बंद करण्याचा मोठा निर्णय़ घेतलाय. शालेय शिक्षणाच्या धोरणात नेमके काय बदल झाले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीकोनातून ठोस पाऊलं उचलत केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय.. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ अर्थात न-नापास धोरण रद्द करण्यात आलंय.. यामुळे आता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवता येणार नाही. नेमका हा निर्णय कसा आहे पाहूया

पाचवी, आठवीतील 'ढकलगाडी' बंद

पाचवी, आठवीला नापास तर नापासच

नापास विद्यार्थ्यांना पास करणार नाही

पाचवीपुढील न-नापास धोरण केंद्राकडून रद्द

नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकललं जातं

आता नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागणार

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देता येणार असली तरी त्याही परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात येणार नाही. याआधी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रमोट करण्यात येत होते. मात्र आता केंद्र सरकारने ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केल्यानं नापास झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवले जाईल.मात्र आठवीपर्यंत नापास झाल्यास विद्यार्थ्यांना शाळा काढू शकत नाही, हा नियम कायम ठेवण्यात आलाय

2019 मध्ये शिक्षण हक्क कायद्यात (RTE) सुधारणा करण्यात आली. यानंतर 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी पाचवी आणि आठवीसाठी ‘नो-डिटेंशन पॉलिसी’ आधीच रद्द केली होती. आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेच ही पॉलिसी रद्द केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्हाला अभ्यास करावाच लागेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com