पोलिसांची गाडी दारात असताना २० लाखांची जबरी चोरी; हदगावमधील खळबळजनक घटना

नांदेडमध्ये सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी ५० तोळ्यांच्या सोन्याच्या दागिण्यांसह दीड लाखांची रोकड पळवली आहे.
Nanded Crime News
Nanded Crime NewsSaam Tv
Published On

नांदेड: नांदेडमध्ये (Nanded) सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी ५० तोळ्यांच्या सोन्याच्या दागिण्यांसह दीड लाखांची रोकड पळवली आहे. हदगावात मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. हदगाव मधील प्रसिध्द व्यापारी यादवअप्पा गंधेवार यांच्या घरावर ४ जणांनी दरोडा टाकत घरातील सर्वांना शस्त्राचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

Nanded Crime News
Presidential Election 2022: आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान! द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा; कोण मारणार बाजी?

मिळालेली माहिती अशी, हदगाव मधील प्रसिध्द व्यापारी यादवअप्पा गंधेवार यांच्या घरावर ४ जणांनी दरोडा टाकत घरातील सर्वांना शस्त्राचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना समोर आली आहे. हातपाय बांधून मारहाण केली तसेच सहा महिन्याच्या बाळाला पळवून नेतो अशी धमकी देत दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले मंगळसुत्र, लॉकेट, अंगठ्या, पाटल्या, नेकलेस असे २० लाख रुपये किंमतीचे ५० तोळे सोन्याचे दागिने आणि दिड लाख रुपये रोख रक्कमची चोरी केली आहे.

Nanded Crime News
धक्कादायक! नासर्डी नदीत मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू

गस्तीवर पोलीस (Police) गाडी घराजवळ आली होती मात्र, दरोडेखोरांनी गळ्यावर चाकु लावलेला असल्याने आवाज देता आला नाही. चोरटे पसार झाल्यानंतर यादवअप्पा यांच्या कुटूंबियांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस श्वानपथक, ठसे तज्ज्ञासह घटनास्थळावर पोहचले आणि तपास सुरू केला. दरोडेखोर हे दोन दुचाकी वरुन आले होते अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात हदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दरोड्याच्या घटनेमुळे हदगाव शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com