Nanded Accident News
Nanded Accident NewsSaamtv

Nanded Accident News: नांदेडमध्ये भीषण अपघात! प्रवासी व्हॅन - टॅम्पोची समोरासमोर धडक; ४ जणांचा मृत्यू

या अपघातामुळे वाहतुकीमध्येही मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतुक सुरळित करण्याचे काम सुरू आहे.
Published on

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded Accident News: नांदेडमध्ये एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर- नांदेड रस्त्यावर टाटा मॅजिक आणि विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होवून मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Accident News Marathi)

Nanded Accident News
Washim News: जीवंत आजीला तलाठ्याने दाखविले मृत; वर्षभरापासून श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद

भीषण अपघात...

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडमधून (Nanded) एक मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. टेम्पो चालकाचे नियत्रंण सुटल्याने भोकरकडे जाणाऱ्या प्रवाशी टाटा मॅजिकला या टेम्पोने जोराची धडक दिली. समोरा समोर झालेल्या या धडकेत टाटा मॅजिकमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतांमध्ये भुलाबाई जाधव,संदीप किसवे,संजय कदम,बापूराव राठोड या चार जणांचा समावेश आहे. नांदेडच्या भोकर- नांदेड (Bhokar- Nanded Road) रस्त्यावरच्या सिताखंडी घाटातील ही दुर्घटना झाली. (Accident News)

Nanded Accident News
Maharashtra Politics: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा दावा! कोणता नेता प्रबळ दावेदार?

वाहतूक विस्कळीत..

हा अपघात इतका भयंकर होता की ऑटोचा पुर्णपणे चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघातातील जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामुळे वाहतुकीमध्येही मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतुक सुरळित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भीषण अपघातात चौघांनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com