वर्धा - तालुक्यातील नायरा पेट्रोल Petrol डीझल डेपोत चालक क्लीनरचा संप काल पासून सुरू आहे. नायरा डेपोत विदर्भातील 11 जिल्ह्यातून पेट्रोल डिझेलचे टँकर Tanker भरण्या करिता येतात, नायरा डेपोत त्यांच्याकरिता पार्किंगची व्यवस्था न असल्याने त्यांना एक एक दिवस रोडवर पेट्रोल डिझेलचे टॅंकर घेऊन उभे राहावे लागते. त्यामुळे रोड जाम ही समस्या नित्याची असल्याने गावकरी आणि टॅंकरच्या चालकांमध्ये रोज वाद निर्माण होत आहेत. ड्रायव्हर क्लिनरची मागणी आहे की नायरा डेपोने पार्किंगची Parking सुविधा द्यावी या करिता त्यांनी कालपासून संप पुकारला आहे .
हे देखील पहा -
निमगाव आंबोडा या गावांना जोडणारा हा सिंगल रस्ता आहे. त्यामुळे गावकर्यांची याच रस्त्याने येजा आहे आणि आमचे टँकर इथे उभे राहत असल्याने अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आमचा वाद गावकऱ्यांशी होते. याबाबत डेपो अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण त्यांनी आमच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही संप पुकारला आहे. आम्हाला कायमस्वरूपी पार्किंग आणि आमच्या अन्य मागण्या जोपर्यंत डेपो मान्य करत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असे रिपब्लिकन युनियनचे अध्यक्ष मोहम्मद शकील यांनी सांगितले आहे.
विदर्भातील अकरा जिल्ह्यांना नायरा डेपोतून इसार, इंडियन ओईल ,एचपीसीएल, रिलायन्स या सारख्या मोठ्या कंपन्या याच डेपोतुन पेट्रोल-डिझेलची उचल करतात. त्यांना पेट्रोल-डिझेलचा सप्लाय केला जातो. आता तो होणार नसल्याने विदर्भातील अकरा जिल्ह्यात पेट्रोल डीझलची समस्या निर्माण होऊ शकते असे आंदोलन करणाऱ्या ड्रायव्हर क्लिनर कडून सांगण्यात आले आहे. नायरा डेपोने व प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा अन्यथा इतरही डेपोत संप पुकारण्यात येईल असे रिपब्लिकन ड्रायव्हर क्लिनर युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शकील शेख यांनी सांगितले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.