नागपूरचं झालं वासेपूर, चुकीचा रस्ता दाखवून पर्यटकांची लूट, चाकूचा धाक दाखवून 8 लाखांचं सोनं लंपास

“Nagpur Turning into Wasseypur: पावसाळ्यात पर्यटनासाठी घराबाहेर पडत असाल तर सावध व्हा... कारण मौजमजेसाठीचं पर्यटन तुमच्या आयुष्याभराच्या कमाईवर डल्ला मारू शकतं....कारण पर्यटनासाठी गेलेल्या एका दामपत्याला चोरांनी नेमका कसा गंडा घातलाय? आणि नागपूरचं वासेपूर कसं झालयं ? पाहूयात या रिपोर्टमधून...
Tourist couple robbed at knifepoint near Nagpur after being misled by attackers posing as locals.
Tourist couple robbed at knifepoint near Nagpur after being misled by attackers posing as locals.saam tv
Published On

हा व्हिडिओ नीट पाहा.... पावसाळी वातावरणात कुटुंबासोबत पर्यटनासाठी घराबाहेर जात असाल तर चोरट्यांकडून अशीच तुमचीही लूट केली जाऊ शकते.... होय तुम्ही बरोबर ऐकताय....नागपूर-बुटीबोरी मार्गावर एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत लाखो रुपयांना लुटल्याची हा धक्कादायक प्रकार समोर आलाय...विशेष म्हणजे, ज्यांना रस्ता विचारला त्यांनी आधी रस्ता दाखवला आणि मग दाम्पत्याला लुटलं. पण या सगळ्यात दामपत्याच्या लहान मुलीनं दाखवलेल्या प्रसंगावधानाने चोरट्यांचा कारनामे थेट कॅमेऱ्यात कैद झालाय...ही व्हिडिओ पुन्हा पाहा....

लुटारूंनी या पर्यटकांना बेदम मारहाण केली. गळ्यावर चाकू ठेवून सोन्याची चेन आणि पत्नीचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले. जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचे दागिने घेऊन लुटारू पसार झाले. या घटनेनंतर साम टिव्हीनं हजारे दामपत्याची भेट घेऊन प्रत्यक्ष काय घडलं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला...दरम्यान गुन्हेगारांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मोबाईल फोडला खरा... पण त्याच मोबाईलमधील डाटा रिकव्हर केल्यानंतर आरोपींचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय... आता याचं व्हिडिओच्या मदतीनं पोलीस आरोपींचा शोध घेतायत.....

अशाच प्रकारे अनेक ठिकाणी पर्यटकांची लूट होत असेल तर चोरांना पोलिसांचा कसलाच धाक नसल्याचं समोर दिसतंय. नागपूरचा प्रकार तर सामान्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासारखाच आहे...दिवसाढवळ्या पर्यकांना चुकीचा रस्ता दाखवून चाकूच्या धाकानं लुटलं जात असेल तर नागपूरचं वासेपूर झालंय की काय असा प्रश्न निर्माण होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com