
नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी
आता नागपूर शहराभोवती ट्रॅक आणि बस टर्मिनल उभारणार
महामार्गावरुन येणाऱ्या वाहनांना बाहेरुनच जाता येणार
नागपूरकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार
नागपूर: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूरभोवती बाह्य वळण रस्ता आणि त्यालगत ४ वाहतूक बेट विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर शहराभोवती ट्रक अॅण्ड बस टर्मिनल उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प नागपूर महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत राबवला जाणार आहे.
अमरावती राष्ट्रीय महामार्ग, हिंगणा राज्य मार्ग, समृद्धी महामार्ग, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, उमरेड राष्ट्रीय महामार्ग, भंडारा राष्ट्रीय महामार्ग, भोपाळ राष्ट्रीय महामार्ग, काटोल राष्ट्रीय महामार्ग, जबलपूर राष्ट्रीय महामार्ग नागपूरमध्ये प्रवेश करतो. या सर्व महामार्गांना जोडण्यासाठी नागपूर शहराभोवती ट्रक आणि बस टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. या महामार्गांना जोडणारा १४८ किमी लांबीचा आणि १२० मीटर रुंदीचा बाह्य वळण मार्ग तयार केला जाणार आहे.
हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या बाह्य वळण रस्त्यामुळे इतर जिल्ह्यांतून येणारी आणि नागपूर शहरातून समृद्धी महामार्गाकडे वाहतूक वळवणे परस्पर शक्य होणार आहे. यामुळे जड वाहनांची वाहतूक थेट बाहेरुनच जाणार आहे.यामुळे नागपूरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
बाह्य वळण मार्ग, ट्रक आणि बस टर्मिनलच्या करारासाठी मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १३ हजार ७४८ कोटी रुपये खर्च येणार असून त्याला मान्यता देण्यात आली आहे.तसेच भूसंपादनासाठी ४ हजार ८०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहे.
या प्रकल्पासाठी ८ हजार ९४७ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत दिला जाईल. या प्रकल्पासाठी नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाद्वारे यंत्रणा काम पाहणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.