Nagpur Explosion : मध्यरात्री नागपूरमध्ये RDX प्लांटमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, १७ जण जखमी, सहा जण ICU मध्ये

Nagpur RDX plant blast : नागपूरमध्ये बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह RDX व TNT तयार करणाऱ्या प्लॅन्टमध्ये. एकाचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी आहेत, त्यातील सहा जण आयसीयूमध्ये. स्फोटामुळे ७००-८०० मीटरपर्यंत मलबा आणि तुकडे फेकले गेले.
Nagpur Blast
Deadly blast at Solar Explosives RDX plant in Nagpur kills one, 17 injured, debris scattered across 700 meters.saam TV Marathi
Published On
Summary
  • नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह RDX प्लांटमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट.

  • एकाचा मृत्यू, १७ जण जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर.

  • स्फोटाची तीव्रता मोठी, ७०० मीटरपर्यंत मलबा विखुरला.

  • दोन वर्षांत कंपनीत दुसऱ्यांदा मोठी दुर्घटना घडली.

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur RDX plant explosion news : उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये RDX बनवणाऱ्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना घडली. बाजारगव येथील सोलार एक्सप्लोसिव्हमध्ये मध्यरात्री 12.30 वाजता PP 15 मधील CB 1 प्लॅन्टमध्ये स्फोट झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. स्फोट झालेल्या या प्लॅन्ट मध्ये hmx TNT आणि RDX ची निर्मिती होते. काही जखमींच्या हाताला, काहींच्या पायाला तर दगड उडल्यामुळे डोक्याला दुखापत झाली आहे.

मध्यरात्री काम सुरू असताना प्लॅन्टमध्ये धूर निघत असल्याचं लक्षात आल्यानंतर कामगारांना तात्काळ बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तेच स्फोट झालेल्या काही अंतरावरून RND लॅबमध्ये असणारा मयूर नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, त्यानंतर मलबा आणि इमारत सहित्याचे तुकडे हे दूरवर फेकले गेले. यातील एक मोठा दगड त्या व्यक्तीला लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

Nagpur Blast
Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळात १५ महत्त्वाचे निर्णय, मुंबई-पुण्यासह ठाण्याला फायदाच फायदा, वाचा सविस्तर

सोलार एक्सप्लोसिव्ह ही दारुगोळा बनवणारी मोठी नामांकित कंपनी आहे. 17 डिसेंबर 2023 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने स्फोट झाला होता. त्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दोन वर्षांमध्ये पुन्हा एकदा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, प्लांटपासून पाचशे मीटर अंतरावर काम करत असलेल्या दुसऱ्या प्लांटमधील कर्मचारी या स्फोटातून उडालेल्या मलब्यामुळे जखमी झाले. या ब्लास्टची भीषणता इतकी मोठी होती की जवळपास 700 ते 800 मीटर पर्यंत इमारतीचे सिमेंटचे तुकडे सळाखा या दूरवर फेकल्या गेल्या.

Nagpur Blast
Manoj Jarange : मराठा आंदोलक मुंबईहून गावाकडे परतले अन् पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com