Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी|VIDEO

Police Struggle to Manage Massive: मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील लोणेरे, माणगाव आणि इंदापुर येथे वाहतूक कोंडी झाली आहे. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासामुळे वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून पोलिस प्रशासनावर मोठा ताण आला आहे.
Summary

मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी.

लोणेरे, माणगाव आणि इंदापुर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंडी.

गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासामुळे वाहनांची प्रचंड गर्दी.

पोलिस प्रशासनाचे प्रयत्न असूनही वाहतूक कोंडी तीव्रच राहिली.

मुंबईकर गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासामुळे रायगड जिल्ह्यातील लोणेरे, माणगाव आणि इंदापुर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई लेनवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी इंदापुर, माणगाव आणि लोणेरे येथे बॉटलनेक सारखी परिस्थिती झाल्याने गणेश भक्तांना प्रवासात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन सतत प्रयत्न करत असूनही वाहनांची प्रचंड गर्दी आणि काम सुरू असलेले रस्ते यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com