MLA Viral Video
MLA Viral VideoSaam Tv

MLA Viral Video : शिवसेना आमदारांची भररस्त्यात पोलिसांना शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

Nagpur News : नागपूरमधील रामटेकचे शिवसेना आमदार आशिष जायस्वाल यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आशिष जायस्वाल हे पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

MLA Viral Video
Nashik Crime News : नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत; बहिणीला का छेडलं? भावानं जाब विचारल्याने दोघांवरही हल्ला

शुक्रवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आठवळी बाजारात चार गावगुंडांनी तलवारी फिरवत हैदोस घातला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी गुंडांवर कारवाई करावी यासाठी पोलीस ठाण्याला घेराव केला होता. त्यावेळी शिवसेना (Shivsena) आमदार आशिष जैस्वाल देखील तेथे पोहचले.

पोलिसांची गुंडांना भीती वाटत नाही, पोलीस अवैद्य धंदे वाल्याकडून हप्ते घेतात त्यामुळे कन्हान शहरात अशा घटना घडतात असा आरोप करत आमदार आशिष जैस्वाल यांनी पोलिसांना (Police) शिवीगाळ केली.

MLA Viral Video
Netizens Slam Akshay Kumar: अक्षय कुमार की कॅनेडियन कुमार? नेटकऱ्यांचा संतप्त सवाल

शुक्रवाच्या घटनेतील गावगुंड शैलेश सलामे, निखिल गजभिये, शुभम सलामे आणि गजानन कडनायके यांच्या हैदोसचा देखील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गुंड तलवार फिरवतांना स्पष्ट दिसून येत आहे. महत्वाचे म्हणज हैदोस घालणारे हे गावगुंड अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. यामुळे संतापलेल्या आशिष जायस्वाल यांनी कारवाई का केली नाही, म्हणत पोलिसांनाच शिवीगाळ केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com