Nagpur Politics: महायुतीच्या उमेदवाराचा पराभव भाजपच्या जिव्हारी; शहर कार्यकारिणीला बसवलं घरी

Nagpur Politics : शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला. राजू पारवे यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजपने कामठीमधील शहर कार्यकारणीला घरी बसवलं आहे.
Nagpur Politics: महायुतीच्या उमेदवारचा पराभव भाजपच्या जिव्हारी; शहर कार्यकारिणीला बसवलं घरी
Nagpur Politics
Published On

पराग ढोबळे,साम प्रतिनिधी

नागपूर: रामटेकमधील रामटेकचा महायुतीच्या उमेदवाराचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय. या धक्कादायक पराभवानंतर भाजपने थेट कामठी शहर कार्यकारिणीची बरखास्त केलीय. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. विदर्भातील महत्त्वाच्या जागांपैकी एक असलेल्या रामटेकमध्ये महायुतीला पराभव सहन करावा लागलाय. देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून रामटेक मतदारसंघाची ओळख आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी दणदणीत विजय मिळवत रामटेकच्या गडात काँग्रेसच्या बर्वेने ६ लाख १३ हजार ०२५ मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे कधीकाळी रामटेक मतदारसंघातील कांद्रीचे माजी उपसरपंच आता रामटेकचे खासदार झालेत.

राजू पारवे यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजपने कामठीमधील शहर कार्यकारणीला घरी बसवलं आहे. कामठी हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे. याच मतदारसंघातून राजू पारवे यांना काँग्रेसचे विजयी उमेदवार श्याम कुमार बर्वे यांच्या पेक्षा १८ हजार इतकी कमी मते मिळाले. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात कमी मत मिळाल्यावर कामठी शहर कार्यकारिणी भाजपने बरखास्त केली. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी पत्र काढून कामठी शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांच्यासह कार्यकारिणी केली बरखास्त केली.

विदर्भातील दहापैकी ७ ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप २ आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या १ ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेस विदर्भातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.

Nagpur Politics: महायुतीच्या उमेदवारचा पराभव भाजपच्या जिव्हारी; शहर कार्यकारिणीला बसवलं घरी
Lok Sabha Exit Poll Results 2024 : कधी कसा, कुठे पाहाल लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com