घर बांधण्यासाठी आरोपींनी मारला ATM वर डल्ला; मात्र डाव फसला!
घर बांधण्यासाठी आरोपींनी मारला ATM वर डल्ला; मात्र डाव फसला!Saam TV

घर बांधण्यासाठी आरोपींनी मारला ATM वर डल्ला; मात्र डाव फसला!

पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
Published on

(मंगेश मोहिते)

नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन (Nagpur Police) हद्दीतील मोहन नगर भीमसेन चौक येथील ॲक्सिस बँकेचं एटीएम फोडत असलेल्याची माहिती मिळताच नाईट राउंड वर असलेल्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एटीएम फोडण्याची तयारी करत असताना तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी स्वप्नील जांभुलकर, आकाश नाईक, प्रवीण लव्हाळे हे तिघे ही मित्र असून यातील प्रवीण लव्हाळे यानी काही दिवस अगोदर प्लॉट खरेदी केला होता, त्यावर बांधकाम करण्यासाठी पैस्याची आवश्यकता होती.

त्याने एटीएम फोडण्याचा प्लॅन आपल्या इतर दोन मित्रांना सांगितला, एका रात्रीत बक्कळ पैसे कमावता येईल या आशेने तिघांनी काही दिवस एटीएमची रेकी केली 1 तारखेला पहाटे 3 वाजता तिघेही एटीएम मध्ये हत्यार आणि आवश्यक साहित्य पैसे नेण्यासाठी बॅग घेऊन गेले लाईट बंद केले एटीएम फोडायला सुरुवात केली मात्र याची सूचना पोलिसांना मिळताच पोलीस अॅक्शन मध्ये येऊन आरोपीने बेड्या टाकल्या त्यामुळे तिघे मित्र आता स्वप्नातील घर तुरुंगात बांधतील हे निश्चित, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही हे तरुणांनी या घटनेवरून शिकण्याची गरज आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com