फक्त दंड वसूल करून चालणार नाही, कारवाई करा; कर्णकर्कश सायलेन्सरबाबत कोर्टाचे पोलिसांना थेट आदेश

Silencers : कर्णकर्कश सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर केवळ दंड न वसूल करता ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.
Loud Silencer Ban
Loud Silencer Ban
Published On

पराघ ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Loud Silencer Ban : रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर केवळ दंड वसूल करून हा प्रश्न सुटणारा नाही. लोक सहज दंड भरायला तयार होतात, मात्र यामुळे या समस्येला आळा बसत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे अशा गाड्यांवर आणि चालकांवर आळा घालण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता मोटार वाहन कायद्यातील (Motor Vehicles Act) तरतुदींचा वापर करून कडक व ठोस प्रतिबंधात्मक पावले उचला, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

याप्रकरणी न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूर पोलीस आयुक्तांना ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काय ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत? यावर ७ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Loud Silencer Ban
Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेटमध्ये २ नव्या मंत्र्यांची एंट्री निश्चित? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच 'या' नावांची चर्चा

मागील तीन वर्षांत नागपूर पोलिसांनी अशा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत १० लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, तरीही शहरात सुधारणा झालेली नाही.

वर्ष २०२४: ५६८ प्रकरणांमध्ये कारवाई - ₹३,४६,५०० दंड वसूल

वर्ष २०२५: ६९३ प्रकरणांमध्ये कारवाई - ₹५,२८,००० दंड वसूल

वर्ष २०२६ (जुलैपर्यंत): २५५ प्रकरणांमध्ये कारवाई - ₹१,५३,००० दंड वसूल

Loud Silencer Ban
Housing Society : सोसायटीने गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती केली? आताच जाणून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

उत्सवाच्या नावाखाली आवाजाची मर्यादा ओलांडण्याची परवानगी नाही

न्यायालयाने आगामी सण-उत्सवांच्या काळातील ध्वनिप्रदूषणावरही अत्यंत महत्त्वाचे विधान केले. "उत्सवांच्या काळात प्रशासनाकडून ध्वनिप्रदूषणासाठी दिलेली परवानगी म्हणजे आवाजाची निश्चित मर्यादा ओलांडण्याची किंवा नियम मोडण्याची मुभा नव्हे," अशा शब्दांत न्यायालयाने स्पष्ट सुनावले. उत्सवाच्या काळातही मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई झालीच पाहिजे, असा सूर न्यायालयाने लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com