I Love You म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नाही, हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं

Mumbai High Court: १७ वर्षांच्या मुलीला आय लव्ह यू म्हटल्याप्रकरणी ३५ वर्षीय तरुणाला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हायकोर्टाने त्याची ही शिक्षा रद्द करत आय लव्ह यू म्हणणे म्हणजे गुन्हा होत नसल्याचे स्पष्ट केले.
I Love You म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नाही, हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं
High Court Saam
Published On

पराग ढोबळे, नागपूर

मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तरुणाची शिक्षा रद्द केली. फक्त 'आय लव्ह यू' म्हटल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही. लैंगिक छळाचा हेतू सिद्ध होणे आवश्यक आहे, असे हायकोर्टाने म्हटलं आहे. तसंच, आय लव्ह यू म्हणणे ही फक्त भावना व्यक्त करणे आहे. ते लैंगिक छळ होत नाही असे देखील हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितले. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात हे निरीक्षण नोंदविले आहे.

आय लव्ह यू म्हणणे हे मुलीसंदर्भात भावना व्यक्त करण्याची कृती असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी २३ ऑक्टोबर २०१५ रोजी शाळेतून घरी परत जाताना ३५ वर्षीय आरोपीने तिला रस्त्यात थांबवून हात पकडून आय लव्ह यू म्हटले आणि तिचे नाव विचारले. त्यामुळे मुलगी घाबरली. घरी पोहोचल्यानंतर या मुलीने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

I Love You म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नाही, हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं
Nagpur: खेळता-खेळता उघड्या चेंबरमध्ये पडली, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; आई वडिलांचे रडून रडून हाल

१८ ऑगस्ट २०१७ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला लैंगिक छळाच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ते अपील मंजूर करून हायकोर्टाने आरोपीला निर्दोष मुक्त केले. उर्मीला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

I Love You म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नाही, हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं
Nagpur Video : दोन्ही हात हवेत, स्कूटीवर मांडी घालून बसला, पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये भयंकर स्टंट; VIDEO

लैंगिक छळामध्ये शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, बळजबरीने निर्वस्त्र करणे, अश्लील हावभाव किंवा टिप्पणी करणे अशा प्रकारचा कृतींचा समावेश होतो, असे हायकोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. तसंच, जर कुणी आय लव्ह यू म्हणत असेल तर तो प्रेम करतो किंवा त्याच्या भावना व्यक्त करतो. तर तो कोणत्याही प्रकारचा लैंगिक हेतू दाखवतो असे ठरणार नाही, असे देखील कोर्टाने स्पष्ट केले.

I Love You म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नाही, हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं
Nagpur Crime : दुचाकीनं चायनीजच्या टपरीवर जाताना अडवलं, जुन्या रागातून टोळक्याने संपवलं; नागपुरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com