Nagpur Poshan Aahar: पोषण आहारात आढळली मृत चिमणी, नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

Dead Sparrow Found In Poshan Aahar: पोषण आहारात मृत चिमणी आढळल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोषण आहार पुरवठा धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Nagpur Poshan Aahar: पोषण आहारात आढळली मृत चिमणी, नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड
Dead Sparrow Found In Poshan AaharSaam Tv

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये पोषण आहारामध्ये (Nagpur Poshan Aahar) मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोषण आहारात मृत चिमणी आढळल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोषण आहार पुरवठा धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात पोषण आहारामध्ये चिमणी आढळली आहे. नागपूरात पारशिवानी तालुक्यातील घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लहान मुलांच्या आहारात मृत चिमणी आढळल्याने खळबळ उडाली आहे. निल नेहाल शिंदेकर यांच्या घरी देण्यात आलेल्या पोषण आहारात ही मृत चिमणी आढळली आहे. ० ते ३ वयोगटातील मुलांना हा पोषण आहार दिला जात होता.

Nagpur Poshan Aahar: पोषण आहारात आढळली मृत चिमणी, नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड
VIDEO: Pune Drugs प्रकरणात मोठी अपडेट, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन

पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्षाने ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Nagpur Poshan Aahar: पोषण आहारात आढळली मृत चिमणी, नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड
Nagpur Hit And Run: नागपुरात पुन्हा 'हिट ॲण्ड रन';भरधाव ट्रकने अल्पवयीन मुलाला चिरडलं!

दरम्यान, पुणे जिल्ह्यात देखील अशाचप्रकारची घटना घडली आहे. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मुगडाळ यांना कीडे आणि आळ्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे. बहुळ ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेत येऊन पाहणी देखील केली.

Nagpur Poshan Aahar: पोषण आहारात आढळली मृत चिमणी, नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड
Mumbai Water Crisis News: मुंबईकरांचे टेन्शन वाढलं, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्केच पाणीसाठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com