

नववीच्या विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळला
कामठीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची पोलिसांकडून चौकशी सुरू
शाळेत न गेल्याने आई ओरडली होती
नवीन कामठी पोलिस तपास करत आहेत
नागपूरमध्ये रेल्वे रुळावर नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूरच्या कामठी परिसरातील ही घटना आहे. आईने शाळेत का जात नाही? असा प्रश्न विचारल्यावर तो घरातून निघून गेला आणि परत आलाच नाही. घरी आला तो थेट त्याचा मृतदेह. मोहम्मद निहाल शफी शेख असं मृत मुलाचे नाव आहे. नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-हावडा रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद निहाल गेल्या सहा दिवसांपासून शाळेत जात नव्हता. मंगळवारी आईने "शाळेत का जात नाहीस?" असा प्रश्न विचारला होता. यानंतर मुलाने कोणतेही उत्तर न देता शांतपणे जेवण केले आणि घराबाहेर पडला. घरातून गेल्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत परत आलाच नाही. कुटुंबीयांनी दिवसभर त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मुलगा सापडत नसल्यामुळे ते चिंतेत आले.
शेवटी बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजता रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळला. ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या आहे की अपघात की अन्य काही याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत. नवीन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.