Nagpur - Madgaon : विदर्भ आणि कोकणकरांचा प्रवास होणार सुसाट; नागपूर - मडगाव एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत, कसं असेल दररोजचं वेळापत्रक?

Nagpur Madgaon Express News : नागपूर-मडगाव दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस म्हणून सुरू झाली आहे. या निर्णयामुळे विदर्भ ते कोकण प्रवास अधिक सोयीस्कर झाला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
NAGPUR MADGAON EXPRESS NOW PERMANENT BIG RELIEF FOR KONKAN TRAVELERS
NAGPUR MADGAON EXPRESS NOW PERMANENT BIG RELIEF FOR KONKAN TRAVELERSSaam Tv
Published On
Summary
  • नागपूर-मडगाव विशेष गाडी आता कायमस्वरूपी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस

  • १६ मे २०२६ पासून नियमित सेवा सुरू

  • विदर्भ ते कोकण प्रवास अधिक सोयीस्कर

  • महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा, प्रवाशांना मोठा फायदा

विदर्भाला जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपूर-मडगाव दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच वर्षभर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेष गाडी म्हणून धावणारी ही रेल्वे आता ‘नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, नागपूरहून ही गाडी १६ मे २०२६ पासून नियमित सेवेत दाखल झाली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ वाजता नागपूर जंक्शनवरून सुटणारी ही एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तसेच, मडगावहून ही गाडी १७ मे २०२६ पासून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९:२५ वाजता नागपूरला पोहोचेल.

NAGPUR MADGAON EXPRESS NOW PERMANENT BIG RELIEF FOR KONKAN TRAVELERS
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

या गाडीच्या नियमितीकरणामुळे विदर्भ आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. अशा वेळी ही गाडी नियमित सुरू राहिल्याने तिकीटांसाठी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे.

NAGPUR MADGAON EXPRESS NOW PERMANENT BIG RELIEF FOR KONKAN TRAVELERS
Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

प्रवाशांच्या सोयीचा विचार करून या एक्स्प्रेसला मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड आणि करमाळी या स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे विविध भागांतील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे. एकूणच, नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचे नियमितीकरण हा रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांसाठी घेतलेला सकारात्मक निर्णय मानला जात आहे. यामुळे विदर्भ आणि कोकण यांच्यातील प्रवास अधिक सोयीस्कर, सुलभ आणि वेळेवर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com