चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Nagpur Husband Beats Wife Over Character Suspicion: नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन लहान मुलांनी आई गमावली.
NAGPUR CRIME
NAGPUR CRIMEsaam tv
Published On: 

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत महिलेचे नाव लक्ष्मी रोशन शहाकार असून तिच्या पतीचे नाव रोशन शहाकार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वारंवार वाद घालत होता.

NAGPUR CRIME
शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला, राष्ट्रवादी NDAसोबत जाणार? घडामोडींना वेग

गुरुवारी रात्रीही दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. यावेळी रोशनने लक्ष्मीला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर लक्ष्मीची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर रोशनने तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान लक्ष्मीचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी रोशन शहाकार याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याचा आरोप होता. 2006 मध्ये एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात तो आरोपी होता. या प्रकरणातून दोषमुक्त झाल्यानंतर त्याने नात्यातील लक्ष्मीसोबत प्रेमविवाह केला होता.

NAGPUR CRIME
महाराष्ट्र भूकंपाने हादरला! सकाळ सकाळी ३ जिल्ह्यांमध्ये जाणवले हादरे; शाळेतून पोरांना बाहेर काढले, नागरिकांची पळापळ

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आईच्या मृत्यूमुळे तीन आणि सात वर्षांच्या दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं आहे. या प्रकरणी कपिल नगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com