कर्तव्यावरून परतताना अग्निशामक जवानावर काळाचा घाला; नायलॉन मांज्याने गळा खोलवर कापला, रस्त्यावर रक्ताची धार

Firefighter Injured By Nylon Kite String In Nagpur: नागपूर कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या अग्निशामक जवानाच्या गळ्याला नायलॉन मांज्याने गंभीर जखम झाली. बंदी असतानाही नायलॉन मांज्याचा वापर सुरूच असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
A Nagpur Fire Department personnel was seriously injured after a banned nylon kite string cut his throat while returning home from duty.
A Nagpur Fire Department personnel was seriously injured after a banned nylon kite string cut his throat while returning home from duty.Saam Tv
Published On

मकर संक्रांत संपल्यानंतरही उपराजधानी नागपुरात नायलॉन मांज्याची दहशत कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरात नायलॉन मांज्यामुळे गळा कापला गेल्याची धक्कादायक घटना घडली असून, यात नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील जवान गंभीर जखमी झाले आहेत.

A Nagpur Fire Department personnel was seriously injured after a banned nylon kite string cut his throat while returning home from duty.
एकीकडे अश्रूंचा महापूर, दुसरीकडे धक्कादायक कृत्य; बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीवेळी संतापजनक प्रकार

लकडगंज अग्निशमन केंद्रात प्रमुख अग्निशामक विमोचक म्हणून कार्यरत असलेले गोविंदा बावणे हे ड्युटी संपवून दुचाकीने घरी जात असताना सायंकाळच्या सुमारास कमाल चौक परिसरात ही दुर्घटना घडली. रस्त्यावर उडालेल्या कापलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा अचानक त्यांच्या गळ्यात अडकला. वाहनावर नियंत्रण मिळवण्यात बावणे यशस्वी ठरले, मात्र नायलॉन मांज्यामुळे त्यांचा गळा खोलवर कापला गेला.

A Nagpur Fire Department personnel was seriously injured after a banned nylon kite string cut his throat while returning home from duty.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घाला, इंदुरीकर महाराजांनी का केली मागणी ?

या घटनेत बावणे यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ धाव घेऊन मदत करत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी गळ्याची जखम अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

A Nagpur Fire Department personnel was seriously injured after a banned nylon kite string cut his throat while returning home from duty.
Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

दरम्यान, नायलॉन मांज्यावर शासनाने बंदी घातलेली असतानाही शहरात सर्रास वापर सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी नायलॉन मांजाने कित्येकांचे गळे चिरले जातात. छापे टाकून मांजा जप्त ही केला जातो तरी देखील अशा घटना घडतान दिसत आहे. संक्रांत संपून अनेक दिवस उलटले असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com